FD on Digital Rupee : डिजिटल रुपयाने एफडी करता येते का? काय आहेत RBI चे नियम वाचा

FD on Digital Rupee : RBI ने 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपया लाँच केला. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ई-रुपयाचा वापर दुकानांपासून बँकांपर्यंतच्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. हा डिजिटल रुपया भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे आणि तो भारतीय चलनाच्या बरोबरीचा आहे.

हे पूर्णपणे कायदेशीर चलन आहे. डिजिटल रुपया डिजिटल टोकन म्हणून काम करतो. रिझव्‍‌र्ह बँक सध्या डिजिटल रुपयाचे वितरण आणि किरकोळ विक्री कशी करावी हे पाहत आहे.

डिजिटल रुपयावर व्याज नाही. जसे तुम्ही तुमच्या वॉलेटमधील पैशावर व्याज मिळवत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या डिजिटल वॉलेटमधील डिजिटल चलनावर तुम्हाला व्याज मिळत नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, क्यूआर कोड स्कॅन करूनही डिजिटल रूपये पेमेंट करता येते. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल रुपयाचा वापर बँकेच्या वॉलेट आणि मोबाईल अॅप्लिकेशन, तसेच बँकेने जारी केलेल्या इतर सुविधांसाठी केला जाईल. बँकेत जमा केलेला डिजिटल रुपया भारतीय चलनाप्रमाणेच वैध असेल.

भविष्यात डिजिटल रुपयांचे आणखी फॉरमॅट सादर केले जातील. डिजिटल रुपयाचा वापर रोख रकमेप्रमाणे करता येतो आणि फायद्यासाठी गुंतवणूक करता येते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी राज्यसभेत दिलेल्या निवेदनात सांगितले की, वॉलेटद्वारे डिजिटल रूपये हस्तांतरित केले जाऊ शकतात. मात्र त्यावर व्याज मिळणे सध्या शक्य नाही. येत्या काळात या मुद्द्यावर विचार केला जाईल.

Leave a Comment